शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

सुखान्त जीवनाचा : मॅपकॉनच्या चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:23 IST

जन्माप्रमाणेच मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे, सोहळा आहे असे मानून रुग्ण, त्याचे नातेवाईक प्रत्येकाने त्याचा स्वीकार, त्याचे स्वागत करण्याची तयारी ठेवावी. तरच आजार, त्यामुळे रुग्ण, डॉक्टर, नातेवाइकांना होणारा त्रास, त्यातून निर्माण होणाºया सामाजिक, कायदेशीर समस्या काहीअंशी कमी होऊ शकतील, असा सूर ‘सुखान्त जीवनाचा’ या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

नाशिक : जन्माप्रमाणेच मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे, सोहळा आहे असे मानून रुग्ण, त्याचे नातेवाईक प्रत्येकाने त्याचा स्वीकार, त्याचे स्वागत करण्याची तयारी ठेवावी. तरच आजार, त्यामुळे रुग्ण, डॉक्टर, नातेवाइकांना होणारा त्रास, त्यातून निर्माण होणाºया सामाजिक, कायदेशीर समस्या काहीअंशी कमी होऊ शकतील, असा सूर ‘सुखान्त जीवनाचा’ या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. गुरुवारी (दि.५) शंकराचार्य संकुल येथे महाराष्टÑ असोसिएशन आॅफ फिजिशियन्स (मॅपकॉन) येथे सायंकाळी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.चर्चासत्रात क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. शिवा अय्यर, डॉ. प्रदीप कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उमेश नागपूरकर, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. मनोज गुल्हाणे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता बोरकर, अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी भाग घेत ‘मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर निर्माण होणारे प्रश्न व त्यांचे व्यवस्थापन’ याविषयी महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या. असाध्य रोगांनी आणि वार्धक्याने ग्रस्त झालेल्या रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूला धैर्याने कसे सामोरे जावे आणि होणारे क्लेश कमीत कमी कसे करावेत, याबद्दलचे सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच लहान-मोठ्या आजारांची रुग्णाला स्पष्ट कल्पना देणे, त्याच्यावर करण्यात येणाºया उपचारांची कल्पना देत निर्णय प्रक्रियेत त्याला सहभागी करून घेणे, रुग्ण व नातेवाइकांचा आजार व त्याच्या परिणामांचा स्वीकार, आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय दृष्टिकोनातून उद्भवणारे प्रश्न व त्याचे व्यवस्थापन, इच्छामरण, सुलभ मरण, रुग्णाची काळजी, मृत्यूपत्र, रुग्णाचे अधिकार आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नीलम किर्लोस्कर यांनी यावेळी स्वानुभवाद्वारे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे अनुभव सादर केले. वंदना अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.