वावी प्राथमिक शाळेत विलगीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:36+5:302021-05-08T04:14:36+5:30
वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर (खाटेकर) व वावी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते ...

वावी प्राथमिक शाळेत विलगीकरण केंद्र सुरू
वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर (खाटेकर) व वावी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या हस्ते दोन खोल्यांमध्ये करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
वावी गावात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी काही प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. रुग्ण आढळून आल्यानंतर अनेकांची घरात स्वतंत्र खोली, राहण्याची व शौचालयाची व्यवस्था नसते. त्यामुळे कुटुंबासमवेत कोरोनाबाधित रुग्ण राहिल्याने कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या १० बेडची व्यवस्था करण्यात आली असून रुग्णसंख्या वाढल्यास बेड वाढविण्यात येणार आहेत.
या वेळी सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे, माजी सरपंच रामनाथ कर्पे, विजय काटे, सदस्य प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, कैलास जाजू, रामराव ताजणे, सचिन वेलजाळी, डॉ. कमलाकर कपोते, विनायक घेगडमल, प्रदीप मंडलिक, ज्ञानेश्वर खाटेकर, विजय सोमाणी, आशिष माळवे, जगदीश पटेल, ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०७ वावी स्कूल
वावी प्राथमिक शाळेत वावी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. त्याप्रसंगी साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर, कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, मीना काटे, रामनाथ कर्पे, विनायक काटे, आशिष माळवे आदी.
===Photopath===
070521\07nsk_19_07052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०७ वावी स्कूल वावी प्राथमिक शाळेत वावी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. त्याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर, कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, मीना काटे, रामनाथ कर्पे, विनायक काटे, आशिष माळवे आदि.