एचएएलने बनवलेली विलगीकरणपेटी ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:04 IST2020-04-12T20:41:03+5:302020-04-13T01:04:07+5:30

ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव उपचार करणाऱ्यांवर होऊ नये म्हणून एचएएल नाशिकने विलगीकरणपेटी बनवली आहे, ती आता वरदान ठरू पाहतेय. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या वैश्विक व्हायरसचे दररोज वाढणारे आकडे चिंतेत भर टाकणारे आहेत.

 The separation box created by HAL is a boon | एचएएलने बनवलेली विलगीकरणपेटी ठरतेय वरदान

एचएएलने बनवलेली विलगीकरणपेटी ठरतेय वरदान

ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव उपचार करणाऱ्यांवर होऊ नये म्हणून एचएएल नाशिकने विलगीकरणपेटी बनवली आहे, ती आता वरदान ठरू पाहतेय. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या वैश्विक व्हायरसचे दररोज वाढणारे आकडे चिंतेत भर टाकणारे आहेत. अशातच कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णाला वैद्यकीय सेवा पुरविणा-या वा त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बाधा होताना दिसत आहे.
राज्यात व देशात डॉक्टर व नर्स कोरोनाबाधित झालेले काही ठिकाणी आढळून आले आहेत. त्यांना बाधा होण्यापासून कसे वाचवता येईल, अशी चिंता सर्वच जण करत असताना नाशिक जिल्ह्यातील संरक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नवरत्न कंपनीच्या काही विभागात काम करणाºया काही सदस्यांना पडला असता त्यांनी ज्यापासून लढाऊ विमानाची कॅनोपी बनते ते शीट वरदान ठरू शकते. ती अतिशय सुरक्षित व उपयुक्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रु ग्णावर उपचार करणाºयांना कोणतीही बाधा होणार नाही असे पुढे आले. यावरून मग विलगीकरणपेटी बनवण्याची कल्पना सुचली. लॉककडाउन असताना नाशिक विभागातील पाच शॉपच्या कर्मचाºयांनी एकत्र येत एक बॉक्स बनवला आहे. सदर बॉक्स हा अक्रॅलिक मेटलपासून बनवलेला असतो. जे की लढाऊ विमानाचा पायलटच्या बसण्याच्या वरील भागात लावलेला असतो. प्रायोगिक तत्त्वावर एक विलगीकरणपेटी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सुपुर्द करण्यात आली आहे. त्यांनी आणखी दहा पेट्यांची मागणी केली आहे. त्याला औषध व व्हेण्टिलेटरची जागादेखील करून देण्यात आली आहे. ठरवून दिलेल्या वेळेत नियमाचे काटेकोर पालन करत कामगार सदर बॉक्स बनवण्यात लागले आहेत.

Web Title:  The separation box created by HAL is a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक