शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

अंतापूरला चक्क गावाबाहेरझाडाखाली विलगीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:53 IST

सटाणा : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. लॉकडाउनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्न- पाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य देण्यात आले.

सटाणा (नितीन बोरसे)सटाणा : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. लॉकडाउनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्न- पाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य देण्यात आले. मात्र ते रेशनकार्ड आणि मजुरीअभावी खऱ्या वंचितांच्या पोटात न गेल्यामुळे आज ते कष्टकरी कुपोषितांच्या रांगेत उभे असल्याचे भयावह वास्तव बागलाणचे आहे.यंदा लॉकडाउनच्या काळात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह राज्याच्या अन्य ठिकाणी शेकडो मजूर अडकले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची घरवापसी सुरू झाली आहे. मात्र गाव पातळीवर त्यांना गावाबाहेर विलगीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना चौदा दिवस कामावर जाण्यास मज्जाव केला जात असल्यामुळे आज तरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन मोफत धान्य वाटत आहे. परंतु या कष्टकरी मजुरांकडे रेशन कार्डच नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत आहेत. वास्तविक बाहेरून स्थलांतरित होणाºया रहिवाशांना शासकीय नियमानुसार घोषित केलेल्या विलगीकरण केंद्रात भरती करून त्याच्या अन्नपाण्याची सोय करणे प्रशासनाचे कर्तव्य असताना शेकडो स्थलांतरित मजुरांची मात्र हेळसांड होताना दिसत आहे.---------------------------------थाळीमर्यादेमुळेशेकडो उपाशीपोटीकामाअभावी परप्रांतीय अथवा स्थानिक मजुरांची उपासमारी होऊ नये म्हणून शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळीची व्यवस्था केली आहे. सध्या बागलाण तालुक्यातील सटाण्यात १५० थाळीचे दोन केंद्र सुरू केले आहेत. मात्र ते अपुरे पडत असून, एका तासात तीनशे थाळ्या संपल्यामुळे अनेक गरीब मजुरांना उपाशी राहावे लागत आहे. शहरात आणखी तीन केंद्र तर नामपूर येथे दोन, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.-------------------------------------------पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची समस्याबागलाण तालुक्यात सहा ठिकाणी कोरोना संशयितांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये अजमीर सौंदाणे येथील शासकीय एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूल, नामपूर, सटाण्यात चार ठिकाणचा समावेश आहे. मात्र बहुतांश ठिकाणी पाण्याची आणि स्वच्छतागृहांची मोठी समस्या दिसून येत आहे.-------------------------------कुणी घेतोयडोंगर कपारीचा सहाराकोणी नदीकाठी, कोणीझाडाच्या आडोशाला तर कोणी डोंगर कपारीचा सहारा घेऊन उघड्यावर कोरोनाचे संक्र मण रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीत प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.--------------------------बागलाण तालुक्यात कोरोना संशयितांसाठी सहा विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. संशयितांचे नमुने घेण्यासाठी पश्चिम भागासाठी डांगसौंदाणे ग्रामीण रु ग्णालय कोरोना सेंटर राहील, मोसम आणि काटवन भागासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालय तर उर्वरित भागासाठी सटाणा ग्रामीण रु ग्णालय कोरोना सेंटर म्हणून राहील. तसेच ज्या मजुरांना रेशनकार्डअभावी धान्य मिळत नसेल अशांना सामाजिक संस्थाकडून मदत केली जात आहे. - जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदारआम्ही ऊसतोडणी मजूर आहोत. आम्ही नुकतेच स्थलांतरित झाल्यामुळे आम्हाला चौदा दिवस वस्तीच्या बाहेर ठेवले आहे. रेशनकार्ड नसल्यामुळे आणि झाडाखालीच विलगीकरण केल्यामुळे हाताला काम नाही म्हणून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आमची विलगीकरण केंद्रात सोय करावी.- नानाजी भवरे, मजूर, अंतापूर

 

टॅग्स :Nashikनाशिक