सिंहस्थ निगडित कामांचा वेगळा प्रस्ताव

By Admin | Updated: May 28, 2014 01:29 IST2014-05-28T01:23:29+5:302014-05-28T01:29:28+5:30

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येणार्‍या कामांबरोबरच त्याच्याशी निगडित असलेल्या अन्य कामांचा वेगळा प्रस्ताव तयार करून त्यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

A separate proposal for work related to Simhastha | सिंहस्थ निगडित कामांचा वेगळा प्रस्ताव

सिंहस्थ निगडित कामांचा वेगळा प्रस्ताव

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येणार्‍या कामांबरोबरच त्याच्याशी निगडित असलेल्या अन्य कामांचा वेगळा प्रस्ताव तयार करून त्यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या कामांमध्ये लोकप्रतिनिधींनीही सुचविलेल्या कामांचा समावेश केला जावा, अशा शासनाच्या सूचना असल्याने काही लोकप्रतिनिधींनी कुंभमेळा आराखड्यासाठी काही कामे सुचविली होती. विशेष करून आमदार माणिकराव कोकाटे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी जातात व सिन्नर येथे थांबतात, त्याचा ताण सिन्नर नगरपालिकेवर पडेल. त्यामुळे आरोग्य व पाण्याची सोय करण्यासाठी सिंहस्थ निधीतून तरतूद करावी. त्याचबरोबर शिर्डी येथे पायी जाणार्‍या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता करण्याची मागणीही त्यांनी केली होती. प्रत्यक्षात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यात यातील कामे न घेतल्याबद्दल कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली, तर अशाच प्रकारची मागणी इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी केली. सिंहस्थानिमित्त त्र्यंबकेश्वरला येणारे भाविक पेगलवाडीपर्यंत जातात. त्यामुळे याठिकाणी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करावी, अशी विनंती त्यांनी केली. नाशिक शहरातीलही लोकप्रतिनिधींनी काही कामे सुचविली आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी सिंहस्थ निधी देता येणार नाही; मात्र त्याच्याशी निगडित कामे म्हणून स्वतंत्रपणे त्याचा प्रस्ताव करून शासनाकडून त्याला मंजुरी व निधी मिळवणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.

Web Title: A separate proposal for work related to Simhastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.