स्वतंत्र डाळींब लिलाव केंद्र सुरू
By Admin | Updated: August 2, 2016 01:12 IST2016-08-02T01:12:19+5:302016-08-02T01:12:32+5:30
मिलिंद भालेराव : खरेदी-विक्र ी संघाला बाजार आवाराची मान्यता देणार

स्वतंत्र डाळींब लिलाव केंद्र सुरू
लासलगाव : येत्या दोन दिवसात लासलगाव खरेदी-विक्री संघाला स्वतंत्र बाजार समितीची मान्यता देणार असल्याचे तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार फळे
व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या निर्णयानंतर येथील लासलगाव विभागीय खरेदी-विक्री संघामार्फत महाराष्ट्रात प्रथमच पहिले स्वतंत्र डाळींब लिलाव केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती पणनचे उपविभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिली.
सोमवारी डाळींब लिलावाच्या शुभारंभप्रसंगी भालेराव, रघुनाथ महाराज खटाणे, अध्यक्ष नानासाहेब पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर पहिल्या दोन क्रेटचे लिलाव करण्यात आले. यावेळी ४५०० रुपये प्रतिक्रेट भाव मिळाला.
यावेळी निफाडचे सहनिबंधक पराये, सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पंचायत
समिती सदस्य राजाभाऊ दरेकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जगताप, संजय पाटील, शंतनू पाटील, संघाचे उपाध्यक्ष नितीन घोटेकर, व्यवस्थापक पी. एफ. भालेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)