शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

जिल्ह्यातील १२ पुलांना अलर्ट देणारे सेन्सर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:48 AM

पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत.

नाशिक : पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत. पुलाला धोकादायक पातळीपर्यंत पाणी लागल्यास सेन्सर्सद्वारे त्याची माहिती वेळीच संबंधित कक्षेतील अभियंत्याला भ्रमणध्वनीवर कळणार असून, त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे शक्य होणार आहे.रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीला पूर आल्यामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा नदीवरील पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभर ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येऊन पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटदेखील पूर्ण झाले असून, पुराचा धोका ओळखणारे सेन्सर्स पुलांना बसविण्यात आले आहेत. मागील वर्षीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची खबरदारी घेतली होती.जिल्ह्यातील १०० ते २०० आणि २०० मीटरवरील ब्रिटिशकालीन पुलांना अशा प्रकारचे सेन्सर्स लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मालेगाव, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबक तसेच साउथ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलांना सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत.मालेगाव उपविभागातील गिरणा नदीवरील मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन्ही पूल तसेच काथरे दिगर-सटाणा-मालेगाव- चाळीसगाव रस्त्यावरील पूल, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवरील काचनगाव- काळुस्ते तसेच नाशिक रिंगरोड (मोडाडी फाटा, सय्यद पिंप्री, लाखलगाव) येथील पूल, व नानेगाव पळस, पार नदीवरील करंजूल उंबरपेठ पळसन बाºहे, अंबेपेठ रोड, नार नदीवरील पळसन आमधा, पूनद नदीवरील मोकभनगी, कळवण, ओतूर, मुळाणे, बारी रोड, कडवा नदीवरील नाशिक-दिंडोरी-वणी रोड, सुखी नदीवरील मालेगाव-नांदगाव-शिऊर-औरंगाबादरोड या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहेत. मालेगाव सबडिव्हीजनमधील मोसम नदीवरील सटाणा-अजमिर-सौंदाणे-रावळगावरोड, त्याचप्रमाणे रावळगाव-वडनेर-गरेगाव-पोहणे-झोडगे, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवरील डुबेर-सोनांबे-शिवदे-पांढुर्ली-भगूररोड, त्र्यंबक सबडिव्हिजनमधील आडगाव वाघेरे-गिरणारे-हरसूल-ओझरखेड या ब्रिटिशकालीन पुलांना सेन्सर्स बसविण्यात आले आहेत.धोकादायक स्थितीत पूल बंद करणारपुलाची परिस्थिती पाहून पुलाच्या किती अंतरावर सेन्सर्स बसवावे याचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार पुलावरून पाणी जाण्यापूर्वीच अलर्ट मिळू शकेल, अशा अंतरावर सेन्सर्स बसविले जातात. जेणेकरून पुलावरून पाणी जाण्यापूर्वीच सदर पुलावरून होणारी वाहतूक तातडीने बंद केली जाणार आहे. सेन्सर्सचे संदेश हे संबंधित कार्यकारी अभियंत्याच्या भ्रमणध्वनीशी जोडण्यात आले आहेत.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक