नाशिक : सिडकोतील अश्विननगर येथील संभाजी स्टेडियममध्ये एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. महेंद्र पाटील असे मृताचे नाव असून या व्यक्तीने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील संभाजी स्टेडीयम येथे सकाळच्या सुमारास फिरवायस जाणाऱ्या नागरिकांना बंद अवस्थेत असलेल्या सेतू कार्यालयाच्या पायऱ्यांवर एका अनोळखी इसमाचा मृतदेह असलेल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तत्काळ अंबड पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळविली. ही माहिती कळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनस्थळी केलेल्या पंचनाम्यात समोर आलेल्या माहितीवरून आढळून आलेला मृतदेह सिडकोच्या पाटीलनगर भागातील रहिवासी महेंद्र पाटील यांचा असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पाटील यांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झालाने त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र त्यांचा मृतदेह अशाप्रकारे सेतू कार्यालयाजवळ आढळून आलयाने या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
सिडकोतील संभाजी स्टेेडीयममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 13:17 IST
नाशिक शहरातील सिडकोतील अश्विननगर येथील संभाजी स्टेडियममध्ये एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. महेंद्र पाटील असे मृताचे नाव असून या व्यक्तीने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सिडकोतील संभाजी स्टेेडीयममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ
ठळक मुद्दे संभाजी स्टेडीयमच्या आवारात मृतदेह आढळल्याने खळबळ मयत इसमाने विषारी औषध सेवन केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज