जेष्ठ नागरिकांनी केली नर्मदा परिक्र मा पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 19:05 IST2019-04-03T19:02:46+5:302019-04-03T19:05:29+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील रहिवासी सुकदेव रोकडे (३९) दत्तात्रय चिने (६५) या दोन जेष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वात कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्र मा १३५ दिवसांत सुमारे सहा हजार किलोमीटर अंतर पायी चालण्याचा विक्र म केला असून मानोरी बुद्रुक पंचक्र ोशीत अद्याप कोणत्याही जेष्ठ नागरिकाने नर्मदा परिक्र मा फेरीचा विक्र म अद्याव पूर्ण केली नसल्याचे बोलले जात आहे.

जेष्ठ नागरिकांनी केली नर्मदा परिक्र मा पुर्ण
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील रहिवासी सुकदेव रोकडे (३९) दत्तात्रय चिने (६५) या दोन जेष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वात कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्र मा १३५ दिवसांत सुमारे सहा हजार किलोमीटर अंतर पायी चालण्याचा विक्र म केला असून मानोरी बुद्रुक पंचक्र ोशीत अद्याप कोणत्याही जेष्ठ नागरिकाने नर्मदा परिक्र मा फेरीचा विक्र म अद्याव पूर्ण केली नसल्याचे बोलले जात आहे.
या दोन जेष्ठांनी १८ नोव्हेबरला मानोरी येथून नर्मदा परिक्र मा करण्यासाठी निघाले होते. त्र्यंंबकेश्वर येथे उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या दर्शनाने या तसेच येथील ब्राम्हणांच्या हस्ते अभिषेक, पूजा विधी करून नर्मदा परिक्र मा फेरी करण्यास सुरूवात केली होती. त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान करते वेळी विविध जिल्ह्यातील ११ नागरिकांचा ताफा या नर्मदा परिक्र मा फेरी साठी त्र्यंंबकेश्वर येथून निघाला होता. मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध असलेल्या ओंकारेश्वर येथील श्री भक्ती आश्रम गोमुख घाट या आश्रमकडून पुढील प्रवास यशस्वी व्हावा आणि रस्त्यात काही अडवणूक वगैरे झाल्यास या प्रमाणपत्र देण्यात आले. जसजसा पायी प्रवास दिवसेंदिवस वाढत गेला तसतसा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्यास सुरु वात झाली. यातील अनेक नागरिक अपूर्ण अवस्थेत आपापल्या घरी माघारी परतले होते. परंतु मानोरी येथील दत्तात्रय चीने आणि सुखदेव रोकडे या जेष्ठांनी नर्मदा परिक्र मा पूर्ण करण्याचा निर्धार बाळगला होता. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील प्रवाहित असलेल्या नर्मदा नदीच्या कडेकडेनेच आपला पायी प्रवास केला. नदीच्या कडेने काटेरी झुडपे असल्याने पुढील प्रवास धोकादायक वळणावर येऊन पोहोचला होता. प्रत्येक एका दिवसाला २८ किलोमीटर पर्यंत पायी चालण्याची मर्यादा या दोघांनी ठेवली होती. अखेर संकल्पना पूर्ण करण्यासाठी १३५ दिवसांची वाट पाहावी लागली असून अमरकंटक येथे नर्मदा परिक्रमेचा शेवट झाला.
(फोटो ०३ भास्कर चिने)