भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पोफळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 22:37 IST2016-03-18T22:32:32+5:302016-03-18T22:37:20+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पोफळे यांचे निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पोफळे यांचे निधन
मालेगाव : येथील सोयगाव परिसरातील जनसंघाचे माजी अध्यक्ष तथा मालेगाव भाजपाचे दुसरे शहराध्यक्ष श्रीधर कृष्णराव (बापूसाहेब) पोफळे (९४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. येथील भाजपाचे नेते तथा मामको बँकेचे माजी संचालक भरत पोफळे यांचे ते वडील होत.
मालेगाव जनसंघ तसेच ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष, भाजपाचे दोनवेळा शहराध्यक्ष, राष्ट्रीय एकात्मता समितीचे कायम उपाध्यक्ष, काकाणी वाचनालय व नगरपालिका शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आदि पदांची जबाबदारी पार पाडणारे
हस्तरेषा भविष्यकार असलेले बापूसाहेब यांनी अभिनयाने रंगमंच गाजविले होते.
भाजपाचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी, स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक असलेले बापूसाहेब उत्कृष्ट टेबलटेनिसपट्टू तसेच किक्रेटचे पंचही होते. आपल्या तत्त्वांशी
तसेच विचारधारेशी कधीही तडजोड न करणाऱ्या बापूसाहेबांनी सामाजकार्यात आपली स्वतंत्र
छाप उमटविली होती. असे व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या बापूसाहेबांवर सायंकाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच भाजपाचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
श्रद्धांजली/ पान ३