सेनेची एकहाती सत्ता

By Admin | Updated: May 6, 2017 01:39 IST2017-05-06T01:39:07+5:302017-05-06T01:39:16+5:30

सिडको : सिडको प्रभागात सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने साहजिकच सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Senechi concentration power | सेनेची एकहाती सत्ता

सेनेची एकहाती सत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही सिडको प्रभागात सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने साहजिकच सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु सेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता कायम आहे.
सिडको विभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८ ,२९ व ३१ आदींचा समावेश आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १४, भाजपा ९ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, किरण गामणे आदींचा समावेश आहे, तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, राकेश दोंदे, भगवान दोंंदे, छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड आदींचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे. सिडको प्रभागात सेना (चौदा) पाठोपाठ भाजपा (नऊ) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादन करत तब्बल नऊ नगरसेवक निवडून आणले आहे. परंतु असे असले तरी सेनेचे नगरसेवक अधिक असल्याने सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे. स्थायी समितीवर शिवसेनेकडून नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांना संधी देण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, हर्षा बडगुजर, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, हे या आधीही नगरसेवक होते. तर दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे हे नवीन चेहरे महापालिकेत सामील झाले आहे. यामुळे पक्ष कोणाला संधी देणार हे येत्या १९ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

Web Title: Senechi concentration power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.