लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:55 PM2019-09-19T12:55:55+5:302019-09-19T12:56:14+5:30

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी सकाळी कांद्याला हंगामातील विक्र मी ५१०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला.

Selling onion to Lasalgavi onion | लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव

लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव

Next

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी सकाळी कांद्याला हंगामातील विक्र मी ५१०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला. आज कांदा केवळ २५० वाहनातून झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा माल कमी असल्याने जोरदार स्पर्धा करीत बोली लावली. उन्हाळ कांदा किमान १३०० ते ५१०० व सरासरी ४६०० रूपये भावाने सकाळी बोली लागली. बुधवारच्या तुलनेत १३५२ रूपयांची तेजी होत हा सर्वाधिक भाव जाहीर झाला. नाशिक जिल्ह्यात सर्वच आवारावर कांदा आवक कमी झाली आहे.तसेच आंध्र प्रदेश व करनुल येथील बाजारपेठेत गेल्या तीन दिवसापासुन मोठा पाऊस होत आहे, त्यामुळे तेथे होणारी आवक कमी झाली. त्यामुळे सर्व राज्यातील मागणीचा दाब महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात बाजारपेठेत दिसुन आला. काल लासलगाव येथील बाजारपेठेत ३६४८ तर विंचुर येथील लिलावात ४००० भाव जाहीर झाला होता.

 

Web Title: Selling onion to Lasalgavi onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक