नाशिक : मोलकरणीचे काम करणाऱ्या महिलेने सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याशेजारील स्प्रिंग फिल्ड टॉवर्समध्ये घडली आहे़
गीता नारंग (ए-23, स्प्रिंग फिल्ड टॉवर्स) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे अनिता वाघ (रा. गंगापूर शिवार) ही घरकाम करते़ ५ सप्टेंबर २०१७ ते २ एप्रिल २०१८ या कालावधीत वाघ हिने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ त्यामध्ये चार लाख रुपये रोख, स्टेट बँकेचे धनादेश, ८० हजार रुपये किमतीचा चार तोळे वजनाचा सोन्याचा पंजाबी कड, ४० हजार रुपयांचा सोन्याची चेन, १५ हजार रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीचा समावेश आहे़
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित अनिता वाघविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे़