बछड्यासंगे सेल्फी भोवली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:06 IST2021-02-02T20:53:26+5:302021-02-03T00:06:52+5:30
कसबे सुकेणे : बिबट्याच्या बछड्याला हातात पकडून ऊसतोड कामगाराने त्याच्यासोबत सेल्फी घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने मंगळवारी (दि.२) या सेल्फीबहाद्दराचा कसून शोध घेतला. दरम्यान सायंकाळी या प्रकाराशी संबंधितास ताब्यात घेतल्याने बछड्यासोबतचा सेल्फी कसा अंगलट आला याचीच चर्चा नागरिकात उशीरापर्यंत सुरु होती.

कुरुडगाव शिवारात सध्या ऊस तोडणीचे काम जोरात सुरू आहे. ऊस मजूर काम करीत असतानाच त्यांना बिबट्याचे बछडे सापडले. मात्र ऊसतोड कामगारांच्या मुलो न घाबरता त्या चार ते पाच महिन्यांच्या बछड्याला उचलून घेतले. विशेष म्हणजे जीवाची पर्वा न करता त्या मुलांनी बिबट्याच्या बछड्याबरोबर थेट सेल्फी काढले. दरम्यान, बिबट्याची मादी जवळ असती आणि तिने हल्ला केला असता तर काय अनर्थ घडला असता, याचा विचार न केलेलाच बरा. अशा सेल्फी बहाद्दरांवर वनविभाग कारवाई करणार की फक्त कागदावरच नियमांचे घोडे नाचविणार याकडे निफाड तालुक्यातील प्राणी मित्रांचे लक्ष लागले होते. वनविभागाने त्या सेल्फीबहाद्दराचा मंगळवारी कुरुडगाव परिसरात शोध घेऊन त्यास ताब्यात घेतल्याची माहिती वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी शेख यांनी दिली.