नाशिक-कळवण रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत सेल्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:00 IST2017-11-05T23:58:32+5:302017-11-06T00:00:06+5:30

दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या सेल्फी वुईथ खड्डे या मोहीम अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे नाशिक कळवण रस्त्यावर पडलेल्या खड्यांसोबत सेल्फी काढत रस्त्याच्या दुरावस्थेवर प्रकाशझोत टाकला.

 Selfie along with potholes on the Nashik-Kalvan road | नाशिक-कळवण रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत सेल्फी

नाशिक-कळवण रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत सेल्फी

दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या सेल्फी वुईथ खड्डे या मोहीम अंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे नाशिक कळवण रस्त्यावर पडलेल्या खड्यांसोबत सेल्फी काढत रस्त्याच्या दुरावस्थेवर प्रकाशझोत टाकला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते हे रविवारी दिंडोरी तालुका दौºयावर आले होते. त्यांचे दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे , आमदार नरहरी झीरवाळ यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, युवक जिल्हा अध्यक्ष पुरु षोत्तम कडलग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील. अनिल देशमुख, तालुका अध्यक्ष भास्कर भगरे , डॉ गोसावी, युवक अध्यक्ष राजेंद्र उफाडे, कैलास मवाळ यांच्यासह सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Selfie along with potholes on the Nashik-Kalvan road