सिन्नर प्रीमिअर लीगसाठी सोमवारी निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:56 IST2018-03-03T23:56:09+5:302018-03-03T23:56:09+5:30

सिन्नर : येथे क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी सोमवारी (दि. ५) रोजी सुरू होत आहे.

Selection test for the Sinnar Premier League on Monday | सिन्नर प्रीमिअर लीगसाठी सोमवारी निवड चाचणी

सिन्नर प्रीमिअर लीगसाठी सोमवारी निवड चाचणी

सिन्नर : येथे आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स पुरस्कृत सिन्नर प्रीमिअर लीग या लेदर बॉलवरील क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी सोमवारी (दि. ५) रोजी येथील कानडी मळ्यातील मैदानावर सकाळी
१० वाजेपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत यावर्षी पाच संघ सहभागी होणार आहेत. गेल्या दोन वर्षापासून जे गुणवान खेळाडू स्पर्धेत खेळण्यापासून वंचित राहिले, अशा आणखी खेळाडूंना यावर्षी संधी मिळणार आहे. निवड चाचणीस सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Web Title: Selection test for the Sinnar Premier League on Monday

टॅग्स :Sportsक्रीडा