घरफोड्याकडून ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:51 IST2018-03-23T00:51:49+5:302018-03-23T00:51:49+5:30
नाशिक : कॅनडा कॉर्नरवरील इलेक्ट्रिक दुकानात घरफोडी करणाऱ्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली.

घरफोड्याकडून ऐवज जप्त
नाशिक : कॅनडा कॉर्नरवरील इलेक्ट्रिक दुकानात घरफोडी करणाऱ्या संशयितास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरी केलेला सुमारे पाउण लाखाचा मुद्देमालही जप्त केला आहे़ तन्वीर वजीर कादरी (४०, रा. पाथर्डीगाव) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून पाउण लाखाचा चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपालीनगर परिसरातील रहिवासी रोहित येवले यांचे कॅनडा कॉर्नरवरील उत्तम सोसायटीत मोबाइल व इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सोल्युशनचे दुकान आहे. रविवारी (दि़१८) मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने दुकानातील वायरचे बंडल, हेवी ड्यूटी केबल, एलईडी दोन टीव्ही असा ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता़ सदर प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तपास करून संशयित कादरीला अटक केली़ दरम्यान, कादरीकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़