राज ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची बघा महापूरात अशी झाली अवस्था...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 15:16 IST2019-08-11T15:12:32+5:302019-08-11T15:16:17+5:30
भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाने याठिकाणी अद्याप स्वच्छतादेखील करणे पसंत केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून गोदापार्क विकासासाठी प्रयत्न होने ही आशा ठेवणेही नाशिककरांसाठी मुर्खपणाचे ठरणारे आहे.

राज ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची बघा महापूरात अशी झाली अवस्था...
नाशिक : महापालिकेत मागील पंचवार्षिकमध्ये सत्ता असताना राज ठाकरे यांनी खासगी विकासकामार्फत गोदाकाठालगत आगळावेगळा असा ‘गोदापार्क’चा प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पावर लाखो रूपये खर्च करण्यात आले. त्यानंतर गोदापार्क नाशिककर तरूणाईचे आवडते ठिकाण बनले; मात्र २०१६नंतर पुन्हा यावर्षी रविवारी (दि.४) आलेल्या गोदावरीच्या महापूराचा जोरदार तडाखा या प्रकल्पाला बसला. त्यामुळे पुन्हा राज ठाकरे त्यांच्या स्वप्नातील ‘गोदापार्क’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार का? अशी चर्चा नाशिककरांमध्ये होऊ लागली आहे.
मनपाकडून अद्याप स्वच्छताही नाही
गोदापार्क पुन्हा नव्याने आकारास येईल की नाही, याविषयी शंका आहे; कारण भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाने याठिकाणी अद्याप स्वच्छतादेखील करणे पसंत केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून गोदापार्क विकासासाठी प्रयत्न होने ही आशा ठेवणेही नाशिककरांसाठी मुर्खपणाचे ठरणारे आहे. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या स्वप्नातील गोदापार्क पुन्हा झळाली देण्यासाठी काय पावले उचलतात त्याकडे सध्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.