Security week at Nandurshinte bus station | नांदूरशिंगोटे बसस्थानकात सुरक्षा सप्ताह

नांदूरशिंगोटे बसस्थानकात सुरक्षा सप्ताहात मार्गदर्शन करताना विलास पठारे. समवेत प्रवीण अढांगळे, गोपाळ शेळके, दीपक बर्के, सुदाम भाबड, अनिल शेळके, शशिकांत येरेकर, एन. आर. आंधळे, एस. डी. सोनवणे, संदीप रणसुळे आदी.

नांदुरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे असून, त्याअंतर्गत नांदूरशिंगोटे बसस्थानकात सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार प्रवीण अढांगळे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर सरपंच गोपाळ शेळके, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, सुदाम भाबड, अनिल शेळके, शशिकांत येरेकर, एसटी महामंडळाचे एन. आर. आंधळे, एस. डी. सोनवणे, संदीप रणसुळे, मंडळाचे निवृत्त अधिकारी विलास पठारे, दिलीप पठारे, रामदास शेळके, सुरेश कुचेकर, संतोष शेळके आदी उपस्थित होते. अढांगळे यांनी सुरक्षा सप्ताहाबाबत मार्गदर्शन केले. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासी वर्ग व विद्यार्थी यांच्याबरोबर नम्रतेने बोलावे, अरेरावीची भाषा वापरू नये, त्यांना आदराची वागणूक द्यावी. बायपासवरून जाणारी वाहने गावातून वळवावी, वेगावर नियंत्रण ठेवावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. आंधळे यांनी एसटी महामंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवासी उपस्थित होते.

Web Title: Security week at Nandurshinte bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.