सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे सुरक्षाकवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST2021-06-22T04:10:35+5:302021-06-22T04:10:35+5:30
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका तसेच पोलीस अधिकारी व ...

सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे सुरक्षाकवच
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत
येणाऱ्या गावांमधील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून व रचना ट्रस्ट व जेनिक्स इंजिनीअरिंग यांच्या सहकार्याने मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, वाफेचे मशीन दिंडोरी तालुका समन्वयक जयदीप गायकवाड यांनी प्रत्यक्ष जाऊन साहित्यवाटप केले. याप्रसंगी मोहाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एच. लोणे, डॉ. कल्याणी बुनगे, डॉ. कल्पेश चोपडे, माया पांडे, जनार्दन वाघेरे, उपसरपंच गणेश तिडके, सामाजिक कार्यकर्ते योगेश तिडके, पर्यवेक्षिका वंदना पाटील, आशा गटप्रवर्तक रेखा राजदेव, मंगल कळमकर, प्रीती देशमुख आदी उपस्थित होते.
फोटो- २० दिंडोरी कोरोना
===Photopath===
200621\410120nsk_36_20062021_13.jpg
===Caption===
फोटो- २० दिंडोरी कोरोना