आदिवासी महासंघातर्फे सचिव गायकवाड यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 00:17 IST2021-07-05T22:53:46+5:302021-07-06T00:17:15+5:30
येवला : अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेसच्या सचिवपदी व जळगाव जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल एकनाथ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

एकनाथ गायकवाड यांचा सत्कारप्रसंगी शरद राऊळ, किशोर सोनवणे आदी.
येवला : अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेसच्या सचिवपदी व जळगाव जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल एकनाथ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
क्रीडा प्रबोधनी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शरद राऊळ, किशोर सोनवणे यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार केला गेला. आदिवासी भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नांसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे गाायकवाड यांनी सत्काराला उत्तर देताना, सांगितले. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष धीरज परदेशी, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, पुरुषोतम राहणे, राहुल भांडगे, कौतिक पवार, रावसाहेब खुरासने, मच्छींद्र मोरे, स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, भगवान चित्ते आदी उपस्थित होते.