सलग दुसऱ्या वर्षी वारी हुकल्याची खंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:51 IST2021-07-19T19:49:41+5:302021-07-19T19:51:29+5:30
नाशिक- ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको ना दे हरी...’ हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी जगावरील महामारीच्या संकटाने सलग दुसऱ्या वर्षी वारी हुकल्याची खंत आणि हुरहुर भाविक वारकरी तसेच अनेक हभप वारकऱ्यांना लागली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी वारी हुकल्याची खंत!
नाशिक- ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको ना दे हरी...’ हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी जगावरील महामारीच्या संकटाने सलग दुसऱ्या वर्षी वारी हुकल्याची खंत आणि हुरहुर भाविक वारकरी तसेच अनेक हभप वारकऱ्यांना लागली आहे.
नेहमीच्या परंपरेप्रमाणे टाळ-मृदंगाच्या गजरात, संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या जयघोषात आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या व भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणाऱ्या आषाढी वारीचा आध्यात्मिक आनंद यंदा घेता येणार नसल्याची खंत जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाला आणि दरवर्षी न चुकता वारी करणाऱ्यांना वाटत आहे. गतवर्षीप्रमाणेच कोरोनामुळे यंदादेखील पालखी सोहळा झाला नाही. निवृत्तीनाथ माउलींच्या पादुका बसने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत रवाना झाली. त्यामुळे भाविकांना आपापल्या घरूनच विठुरायाला नमस्कार करावा लागणार आहे.