पाच दिवसांतच दुसरा विवाह; वरास अटक

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:20:23+5:30

वणी : पहिल्या पत्नीच्या अंगाची हळद सुकत नाही तोच अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीनंतर दुसरा विवाह करणाऱ्या संशयिताविरुद्ध पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला

Second marriage within five days; Furious arrested | पाच दिवसांतच दुसरा विवाह; वरास अटक

पाच दिवसांतच दुसरा विवाह; वरास अटक


वणी : पहिल्या पत्नीच्या अंगाची हळद सुकत नाही तोच अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीनंतर दुसरा विवाह करणाऱ्या संशयिताविरुद्ध पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला गजाआड करण्यात आले आहे.
नीलेश काळू सोनवणे (रा. लखमापूर) या तरुणाचे शिवाजीनगर, दिंडोरी येथील तरुणीशी गेल्या दहा वर्षांपासून जवळीक होती. १७ मे २०१४ रोजी या दोघांचा विवाह काळाराम मंदिर, नाशिक येथे मुलीच्या आईच्या व नातेवाइकांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर या विवाहितेला शिवाजीनगर (माहेरी) ठेवण्यात आले. दरम्यान, अवघ्या पाच दिवसांनंतर २२ मे २०१४ रोजी नीलेश याने दुसऱ्या मुलीशी औरंगाबाद रोड, नाशिक येथे दुसरा विवाह केला.यादरम्यान, पहिल्या पत्नीकडे विवाहाची कागदपत्रे व फोटोची मागणी नीलेशने केली. काही तरी काळेबेरे असल्याचा संशय पहिल्या पत्नीला आल्याने तिने नकार दिला. नीलेशने त्यांना मारहाण व दमदाटी केली.
तद्नंतर दुसऱ्या विवाहाची माहिती पहिल्या पत्नीला मिळाल्याने तिने पाेिलसांत धाव घेत सदर घटनाक्रम पोलिसांना तक्रारीच्या माध्यमातून दिल्याने नीलेश सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(वार्ताहर)

Web Title: Second marriage within five days; Furious arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.