सातपूरला मुदतबाह्य तुपाचे १७८ पाकिटे सील

By Admin | Updated: September 16, 2016 23:50 IST2016-09-16T23:50:37+5:302016-09-16T23:50:49+5:30

सातपूरला मुदतबाह्य तुपाचे १७८ पाकिटे सील

Seat of 178 packets of Expiry Tupa at Satpur | सातपूरला मुदतबाह्य तुपाचे १७८ पाकिटे सील

सातपूरला मुदतबाह्य तुपाचे १७८ पाकिटे सील

सातपूर : अन्न व औषध प्रशासनाने सातपूर गावातील किराणा दुकानात छापा टाकून मुदतबाह्य वनस्पती तुपाची १७८ पाकिटे सील केल्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात
आली.
सातपूर गावात प्रणव पटेल यांचे किराणा दुकान असून या दुकानातून संजय माचरे यांनी गणपतीच्या प्रसादासाठी वनस्पती तूप खरेदी केले. या तुपापासून केलेला प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांच्या मुलाला त्रास झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केल्याचे माचरे यांनी सांगितले, तर माचरे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उदय वंजारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
सहआयुक्त वंजारी यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी यू. बी. कुंभोजकर व भरत इंगळे यांनी पटेल यांच्या दुकानावर छापा मारला असता दुकानात मुदतबाह्य वनस्पती तुपाची १७८ पाकिटे आढळून आली. ही सर्व पाकिटे सील करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Seat of 178 packets of Expiry Tupa at Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.