शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दिवाळी सुटीच्या हंगामात  नाशिककर गाठणार समुद्रकिनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:30 IST

दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.

नाशिक : दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.दिवाळीच्या पार्र्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये, कार्यालयांना सुटी असते. तीन ते चार दिवसांचा सण आटोपताच सुटीचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडण्याच्या बेतात आहेत. पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण आदी भागांचा समावेश आहे. पर्यटन विकास महामंडळाकडे बहुतांश नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे कोकण पर्यटकांच्या गर्दीने फुलणार आहे.येवा, कोकण आपलोच आसा...यंदा दिवाळीच्या हंगामात कोकणातील तारकर्ली, रत्नागिरी, गणपती पुळे, गुहागर, हरिहरेश्वर, वेलनेश्वर, दिवे-आगर, आवास, मालवण, रेवदंडा, अलिबाग असे सुमारे बारा ते पंधरा समुद्रकिनारे कोकणाला लाभलेले आहेत. तसेच भेरलीमाड, राया, आंबा, सुपारी, केळी, फणस, नारळ, काजू, कोकम यांसह भातशेती हे कोकणचे वैशिष्ट्य मानले जाते. कोकण पर्यटनामध्ये बहुतांश पौराणिक मंदिरांना भेटी देत धार्मिक पर्यटनासह सागरी व नैसर्गिक पर्यटनाचाही आनंद लुटता येतो. याबरोबरच विजयदुर्ग, मुरूड-जंजिरा, महाडजवळील रायगड या किल्ल्यांची भटकंती करत दुर्ग पर्यटनही पूर्ण करता येते.निसर्गाच्या सान्निध्यात ‘दिवाळी’नाशिककर कोकणातील समुद्रकिना-यांसह गोवा, कर्नाटकसह थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे बेत आखत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मनमुरादपणे आनंद लुटत दिवाळी साजरी करणार आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांचीही भुरळ पडत आहे. पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट हाउसफुल्ल झाले आहेत. आगाऊ नोंदणी करत नागरिकांनी देशाटनाची तयारी केली आहे.पर्यटकांचा यावर्षी केरळकडे जाण्याचा ओघ अत्यंत कमी आहे. त्याऐवजी नागरिकांकडून कोकण परिसरातील समुद्रकिनाºयांसह गोव्याची निवड केली जात आहे. कोकण टूरसाठी पर्यटकांची संख्या अधिक आहे. भारतातील पश्चिम समुद्रकिनारा आणि सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेल्या कोकणमधील निसर्गसौंदर्याचा अनुभव पर्यटकांकडून मोठ्या संख्येने लुटला जाणार आहे.पर्यटन विकास महामंडळासह खासगी पर्यटन व्यावसायिकांकडेही पर्यटकांनी ‘कोकण पॅकेज’ची नोंदणी केली आहे. तसेच महाराष्टÑाबाहेर राजस्थान राज्याच्या पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. राजस्थानमधील गड-किल्ले, वाळवंट बघण्यासाठी जयपूर, जोधपूर, जैसलमेर यांसारख्या शहरांची पर्यटकांकडून निवड केली जात आहे.

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिक