अन्नपाण्याच्या शोधात वन्यजिवांची वस्तीकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:44 PM2019-05-05T18:44:47+5:302019-05-05T18:45:09+5:30

येवला तालुक्यातील राजापूर येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावात आलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजिवांना डोंगराळ भागात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याने वानर राजापूर गावात अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसते आहे.

In search of food, wildlife habitats are inhabited | अन्नपाण्याच्या शोधात वन्यजिवांची वस्तीकडे धाव

गॅस दुकानात आलेल्या वन्यजिवाला खाण्यासाठी देतांना.

Next

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावात आलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजिवांना डोंगराळ भागात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याने वानर राजापूर गावात अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसते आहे.
दुष्काळी परिस्थितीचा फटका हा सर्वसामान्यापासून ते पशू- पक्ष्यांना तसेच वन्यजिवांना जास्त प्रमाणात बसतो आहे. राजापूर व परिसरात डोंगराळ भाग असल्याने वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र त्यांना अन्न-पाणी नसल्याने वानरांनी चक्क गावात या घरावरून त्या घरावर उड्या मारत आपल्या भुकेल्या व तहानलेल्या जिवासाठी गावात भटकंती करीत आहे.
गावातील लोक त्यांना खाण्यासाठी भाकरी व पिण्यासाठी पाणी देताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या झळा तीव्र असल्याने वन्यजीव गावातील घरांवर, झाडांवर मुक्काम करीत आहेत. तसेच मानवी वस्तीवर आपल्या जिवाची तहान भूक भागवित आहे.

Web Title: In search of food, wildlife habitats are inhabited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.