ब्राह्मणगावी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सक्षम उमेदवारांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:40 IST2020-12-22T17:40:00+5:302020-12-22T17:40:46+5:30

ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. दोन पॅनल आमने-सामने उभे ठाकणार असल्याने निवडणूकीत रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Search for competent candidates for Brahmangavi Gram Panchayat elections | ब्राह्मणगावी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सक्षम उमेदवारांचा शोध

ब्राह्मणगावी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सक्षम उमेदवारांचा शोध

निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून उद्या (दि.२३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छूकांकडून कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. ८ पुरुष सदस्य व ९ महिला सदस्य अशा १७ जागांसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. त्यात अनुसूचित जाती २ , अनुसूचित जमाती ५ , ओबीसी वर्ग ५ , सर्वसाधारण ५ या जागांचा समावेश आहे. विद्यमान सदस्यांपैकी अनेक सदस्य यंदाही रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक असल्याने नवख्या उमेदवारांची संख्या मोजकी आहे. काही चांगल्या उमेदवारांची निवडणूक लढविण्याची इच्छा दिसत नसली तरी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले, हे पाच दिवसानंतरच कळणार आहे. मात्र तरुणांकडून सोशल मिडियावर ग्रामपंचायत निवडणूकीवर वेगवेगळ्या गंमतीशीर चर्चा झडू लागल्या आहेत.

Web Title: Search for competent candidates for Brahmangavi Gram Panchayat elections