निरीक्षण गृहातील फरार बालकांचा शोध सुरूच
By Admin | Updated: June 11, 2017 00:39 IST2017-06-11T00:39:05+5:302017-06-11T00:39:15+5:30
नाशिक : सुरक्षा यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन उंटवाडी रोडवरील बालनिरीक्षण गृहातून दहा विधिसंघर्षित बालकांनी पलायन केल्याची घटना बुधवारी (दि़ ७) सकाळी घडली होती़

निरीक्षण गृहातील फरार बालकांचा शोध सुरूच
!लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सुरक्षा यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन उंटवाडी रोडवरील बालनिरीक्षण गृहातून दहा विधिसंघर्षित बालकांनी पलायन केल्याची घटना बुधवारी (दि़ ७) सकाळी घडली होती़ या घटनेस दोन दिवस उलटले असून, अद्याप या फरार मुलांचा शोध लागला नसून पोलीस त्यांच्या मागावर आहेत़ दरम्यान, या घटनेमुळे बालसुधारगृहाच्या सुरक्षेचा तसेच रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात बालनिरीक्षण गृहातील नानाजी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़७) सकाळी दहा विधिसंघर्षित बालकांनी सुरक्षा यंत्रणेचे लक्ष नसल्याची संधी साधत बालनिरीक्षण गृहाच्या हॉलमधील खिडकीचे गज वाकवून पोबारा केला़ या मुलांचा प्रशासनाने शोध घेऊनही ते न सापडल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला़