शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत दोन दुकानांना लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:18 IST

घोटी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ग्रामीण भागातही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता इगतपुरी तालुक्यात संयुक्त कारवाई मोहीम सुरू केली आहे. नियमांची पायमल्ली व उल्लंघन कारणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना दुकाने सील, दंडात्मक कारवाई केली जात आहे. घोटी दोन दिवसात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दुकाने सील करण्यात आली तर उर्वरितांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : दोन दिवसात पंचवीस हजाराची दंडात्मक कारवाई

घोटी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ग्रामीण भागातही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता इगतपुरी तालुक्यात संयुक्त कारवाई मोहीम सुरू केली आहे. नियमांची पायमल्ली व उल्लंघन कारणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना दुकाने सील, दंडात्मक कारवाई केली जात आहे. घोटी दोन दिवसात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दुकाने सील करण्यात आली तर उर्वरितांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.या अचानक सुरु झालेल्या मोहिमेचा दुकानदार व नागरिकांनी धसका घेतला असला तरी अद्यापही विनामास्क वावरणारे नागरीक व गर्दी कारणाऱ्यांविरुद्ध गुरुवारिी (दि.२५) दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरूच होती. जिल्ह्यात खुद्द जिल्हाधिकारी यांनी भेटी देऊन दुकाने सील करत असल्याने आता तालुका पातळीवरही यंत्रणा कामाला लागली आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कोरोना समूह संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार घोटी शहरातील दुकानदारांवर तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, ग्रामपालिका घोटी यांच्या संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या मोहिमेत बुधवारी (दि.२४) सायंकाळी सात वाजेनंतर दोन दुकाने सील करण्यात आली तर सायंकाळी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मास्क न वापरणे, वेळेत दुकान बंद न करणे, दुकानात गर्दी ठेवणे यांसह राज्य शासनाच्या नियमांची पायमल्ली कारणाऱ्यांविरुद्ध सलग दोन दिवस ही मोहीम चालू आहे. दरम्यान या मोहिमेत उपनिरीक्षक संजय कवडे, ग्रामविकास अधिकारी रविंद्र धुंदाळे, मंडळ अधिकारी शाम बोरसे, आदी अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून बहुतांश ठिकाणी गर्दी जास्त होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांनी प्रादुर्भाव थांबवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे अन्यथा नियमांचे पालन न करणाऱ्यावर कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल.- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, इगतपुरी. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारcorona virusकोरोना वायरस बातम्या