पिंपळगाव बसवंतला तीन दुकानांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:56 IST2020-06-10T22:02:52+5:302020-06-11T00:56:46+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरातील बाजारपेठ सहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास असल्याने मंडलाधिकारी व तलाठी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत शहरातील तीन दुकाने सील केली आहेत.

पिंपळगाव बसवंतला तीन दुकानांना सील
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरातील बाजारपेठ सहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास असल्याने मंडलाधिकारी व तलाठी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत शहरातील तीन दुकाने सील केली आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी आदींनी व्यावसायिक व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनापासून पिंपळगावकरांची सुरक्षा व्हावी यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. नियमावली तयार करण्यात आल्या. तरीही नियमांचे उल्लंघन करत नियम धाब्यावर बसवत चोरून व्यवसाय करू लागल्याने प्रशासनाने तीन दुकानदारांवर कारवाई करत त्यांची दुकाने अनिश्चित काळासाठी सील केल्याची माहिती मंडलाधिकारी नीळकंठ उगले, तलाठी चंद्रकांत पंडित व ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी दिली.