चयल खुनातील 22संशयितांच्या 'मोक्का'वर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 06:51 PM2021-05-12T18:51:00+5:302021-05-12T18:52:18+5:30

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता

Seal on Mocca of Chayal murder suspects | चयल खुनातील 22संशयितांच्या 'मोक्का'वर शिक्कामोर्तब

चयल खुनातील 22संशयितांच्या 'मोक्का'वर शिक्कामोर्तब

Next
ठळक मुद्देअपर पोलीस महासंचालकांनी दिला 'ग्रीन सिग्नल'

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढत टोळीच्या गैरमार्गाने सुरू असलेल्या वसुलीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणातून मगील वर्षी १६ नोव्हेंबरला योगेश पन्नालाल चयल (२३,रा. देवळाली गाव) यास एका टोळीने कोयत्याने सपासप वार करुन ठार मारले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांसह त्यांच्या अन्य अकरा साथीदार अशा एकुण २२ गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करत प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. बुधवारी (दि१२) या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली.

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयितांविरुध्द पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या वेळी चयल याचा मित्र सुरज बद्रीनारायण कहाणे यास संशयित हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्याची ॲक्टिवा दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत पलायन केले होते. उपनगर पोलीसांसह गुन्हेशाखा युनिट २ व मध्यवर्ती गुन्हेशाखा यांच्या पथकांनी समांतर तपास करत गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार सागर सुरेश म्हस्के उर्फ सोनु पाईकराव (२२) याच्यासह एकुण ११ संशयितांना अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात संघटितप्रकारे गुन्हेगारांची टोळी सक्रीय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, उर्वरित ११ साथीदारांच्या दुसऱ्या टोळीच्याही मुसक्या बांधल्या. या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्काअन्वये कारवाई करत सहायक आयुक्त समीर शेख यांच्याकडे तपास सोपविला. गुन्ह्यातील २२ संशयितांच्या टोळीचा मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव पाण्डेय यांनी तयार करुन अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. याबाबत त्यांनी चौकशी करत या प्रस्तावास मंजुरी देत मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

यांच्यावर चालणार 'मोक्का'नुसार खटला
मुख्य सुत्रधार व टोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के उर्फ सोनु पाईकराव याच्यासह रोहीत सुरेश लोंढे उर्फ भु-या, जय उर्फ वाल्मीक घोरपडे, राहुल भारत तेलोरे, कलाम सलिम राईन, सत्तु भैरु राजपुत, हर्ष सुरेश म्हस्के, जॉन चलन पडेची, योगेश श्रावण बोडके, साहील सुरेश म्हस्के, अमन हिरालाल वर्मा, अक्षय राजेंद्र पारचे, बाबु मनियार उर्फ संदिप सुंदरलाल, शिबन शफी शेख, अनुज हरबिर बेहनवाल, गोलु जेसुला बाबु, आतिश वामन तायडे, बॉबी उर्फ हर्ष किशोर बाबु, अजय राजेंद्र लोहट यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांवर आता मोक्कानुसार खटला चालणार आहे. 

Web Title: Seal on Mocca of Chayal murder suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app