मनमाड येथे चार दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:08 IST2020-07-24T21:35:24+5:302020-07-25T01:08:32+5:30
मनमाड : शहरात ठरवून दिलेल्या वाराच्या दिवशी दुकान बंद न ठेवता नियम मोडणाऱ्या चार दुकानांना पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाकडून सील केल्याची कार्यवाही करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मनमाड येथे चार दुकाने सील
मनमाड : शहरात ठरवून दिलेल्या वाराच्या दिवशी दुकान बंद न ठेवता नियम मोडणाऱ्या चार दुकानांना पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाकडून सील केल्याची कार्यवाही करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रसार झपाट्याने वाढत असल्याने नागरिकासह व्यपारी बांधवांनी नियमाचे पालन करण्याकामी वेळोवेळी सूचना करण्यात येत आहेत. परंतु काही व्यापारी व दुकानदार नियमाचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आहे. पालिकेचे मुख्य अधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने शहरातील चार दुकानांना सील करण्याची कार्यवाही केली. मनमाडमध्ये गेल्या काही दिवसापासून आढळणाºया कोरोना बाधितांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे़ नागरिकांनी आरोग्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़