बिबट्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: March 2, 2017 01:30 IST2017-03-02T01:30:34+5:302017-03-02T01:30:48+5:30
दिंडोरी : तालुक्यातील जानोरी शिवारात बिबट्याचा संचार सुरु असून बिबट्याने वासरे व कुत्रे फस्त केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

बिबट्याचा धुमाकूळ
दिंडोरी : तालुक्यातील जानोरी शिवारात बिबट्याचा संचार सुरु असून बिबट्याने वासरे व कुत्रे फस्त केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
वनविभागाने बबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. जानोरी येथील आडगाव रस्त्याच्या व वाघाड कॅनॉललगत असलेल्या शेतकऱ्याचे तीन वासरू तसेच चार कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला चढवत फस्त केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली असता ग्रामपंचायतीच्या सहकार्याने येथील वस्तीत वनविभागाद्वारे पिंजरा लावला आहे.
आडगाव रस्त्यावरील वाघाड कॅनॉललगत राहणारे वाळू किसन घुमरे,संपत विधाते, देवीदास खोडे या तीन शेतकऱ्यांच्या मालकीचे तीन वासरू, तर विनोद तिडके, जगन तिडके व इतर शेतकऱ्यांची कुत्रे बिबट्याने फस्त केली. शेतकऱ्यांमध्ये रात्री-अपरात्री शेताला पाणी देणेसुद्धा अवघड झाले आहे. शेतीकामे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)