मन्सुरा महाविद्यालयात विज्ञानप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:34 IST2019-12-26T23:33:10+5:302019-12-26T23:34:09+5:30
पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ यांचे सहकार्यातून मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालय मनमाड चौफुली मालेगाव येथे ४५ वे मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध गटातील २०० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले.

मन्सुरा महाविद्यालयात विज्ञानप्रदर्शन
संगमेश्वर : पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ यांचे सहकार्यातून मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालय मनमाड चौफुली मालेगाव येथे ४५ वे मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध गटातील २०० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले.
उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जि. प. बांधकाम सभापती मनीषा पवार, सभापती यतिन पगार, जि. प. सदस्य जगन्नाथ हिरे, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, मन्सुरा संस्थेचे अध्यक्ष अशरद मुक्तार, सचिव राशीद मुक्तार, प्राचार्य डॉ. ए. के. कुरैशी आदी उपस्थित होते.
यावेळी मन्सुरा संस्थेचे अध्यक्ष अर्शद मुक्तार म्हणाले, विज्ञान प्रदर्शनसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहेत. मन्सुरा शिक्षण संस्था समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण हे उद्दिष्ट ठेवून मजबूत भारत घडविण्यासाठी आंतरराष्टÑीय शिक्षणाची संधी मालेगाव शहरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
मन्सुरा संस्थेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपक वाघ यांनी केले. शहर व तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला. विजयी स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.