शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील शाळा ३१ जुलैपर्यंत बंदच ;  ऑनलाईन शिक्षणाचा शिक्षणाधिकारी घेणार आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:40 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा उघडण्यासाठी ऑगस्टपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात शाळा बंदचशाळा उघडण्यासाठी ऑगस्टपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकस्तरावर शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी), पालक शिक्षक संघ (पीटीए) व कोरोना प्रतिबंध समितीच्या समन्वयातून निर्णय घेऊन  शक्य तिथे नववी दहावी व बारावीचे वर्ग सुरु करण्याच्या सुचना यापूर्वी दिल्या होत्या. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा उघडण्यासाठी ऑगस्टपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळा सुुरू होऊ शकल्याने नाही. मात्र अनेक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी शासनाच्या सुचनांनुसार ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. अशा शाळांची व कनिष्ठ महाविद्यालयांची शिक्षण विभागाकडे कोणतीही संकलित माहिती नाही, त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने स्वतंत्र लिंक तयार केली आहे.  या माध्यमातून संबंधित शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु झाले अथवा नाही याविषयी माहिती शिक्षण विभागाला ४ जुलैपर्यंत कळविण्याचे अवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले असून प्राप्त होणाऱ्या अहवालांतून शिक्षणाधिकारी ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाने यापूर्वी शाळा व्यवस्थापनांना पत्र दिले होते.  मात्र त्यानुसार कारवाई करण्यास अनेक अडचणी असल्याचे मुख्याध्यापक संघटनेकडून सांगितले  जात असून स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीकडून अपेक्षित सगकार्य मिळत नसल्याचीही मुख्याध्यापक संघाची ओरड आहे. तसेच अनेक मुख्याध्यापक हे ५५ वर्षांच्या वरील आहे. त्यामुळे त्यांनी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वर्क फ्रॉम होम करावे की प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहवे याविषयीही संभ्रम कायम आहे.

मुख्याध्यापक बैठक घेणार कसेशिक्षण विभागाने ५५ वर्षांवरील वयोगटातील शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुचना केली आहे. परंतु, जवळपास ७० ते ८० टक्के मुख्याध्यापक हे ५५ वर्षावरील आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व स्थानिक कोरोना प्रतिबंध समिती यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी  मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष शाळेत जावे किंवा नाही याविषयी मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. तसेच अनेक पालकांना व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना ऑनलाईन बैठकांचे तंत्र अवगत नाही. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भात नियोजन बैठका कशा घेणार,  असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय