शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या मदतीने जुलैपासून शाळा ; शिक्षणाधिकाऱ्यांचा एसएमसी, पीटीएची मदत घेण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:45 IST

स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहेत. 

ठळक मुद्देकोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने शाळा सुरू करा शालेय व्यवस्थानन समिती, शिक्षक पालक समितीचीही मदत घ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्या सुचना

नाशिक : गावातील स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत गुरुवारी (दि.१८) केल्या. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघटनेच्या मदती घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत.  शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा घेऊन गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्या. परंतु, स्थानिक पदाधिकारी व ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यास व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात सहकार्य होत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी केली. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींचे सहकार्य घेऊन शाळा सुरू करण्याचा सल्ला शासनस्तरावरून देण्यात आला आहे. परंतु, त्यासाठी येणारा खर्च करण्यास ग्रामपंचायत तयार होत नसल्याने शाळांची अडचण होत असल्याचे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, रेड झोनमध्ये नसलेल्या नववी, दहावी व बारावीच्या शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्टपासून, वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरू करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत, तर अकरावीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास अनेक ग्रामपंचायतींची तयारी नसल्याचे मुख्याध्यापक संघाच्या सभासदांनी सांगितले. मात्र शाळांनी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने शाळा सुरू करण्याची तयारी करावी ग्रामपंचायतींकडून सहकार्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत स्थरावर मदतीसाठी नियोजन करणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळवून देण्याविषयी आश्वस्त करण्यात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दोन गटांत विभागून दिवसाआड शाळा सुरू करण्याचे नियोजन केले. यात सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस एक गटाचे वर्ग, तर मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुसऱ्या गटांचे वर्ग असे एक दिवसआड शाळा सुरू करण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांनी दिली. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक