शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

शाळांमध्ये बालगोपाळांची निघाली दिंंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:10 AM

विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.

नाशिक : विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.विवेकानंद विद्यालययेथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रभागातील नगरसेवक श्याम बडोदे यांच्या हस्ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात  आले. याप्रसंगी मुख्याध्यापक कल्पना बोरसे, अरुण जाधव, यशश्री गायधनी, धनश्री गर्गे, प्रिया शेवाळे, चित्रा बोंडे, छाया पवार, रश्मी ढोबळे, संदीप जोपळे, विजया ठाकरे व शिरीष विभांडिक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विनायक नवसुपे यांनी केले.डे केअर शाळायेथील डे केअर सेंटर शाळेत शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गायिका संपदा हिरे व माजी विद्यार्थी राहुल उगावकर, रोटरीचे क्लब पश्चिमचे अध्यक्ष कौसर आझाद उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. यावेळी पर्यावरणदूत म्हणून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. आप्पासाहेब उगावकर, सचिव गोपाळ पाटील, अ‍ॅड. अंजली पाटील, वसंत कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, अनिल भंडारी, छाया निखाडे, डॉ. मुग्धा सापटनेकर आदी उपस्थित होते.कर्मवीर हिरे विद्यालयकर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूररोड या शाळेत पहिल्या दिवशी प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक देवराम डामरे, नितीन देवरे, सुजाता पवार आदींसह शिक्षक उपस्थित होते.महादेववाडी मनपा शाळेत नवागतांचे स्वागतसातपूर येथील महादेववाडी येथील मनपा शाळेत नव्याने दाखल झालेल्या नवागतांचे स्वागत आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या उपस्थितीत प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक रेश्मा अवतारे, गोकुळ निगळ, योगेश गांगुर्डे, किरण बद्दर आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे रवींद्र केडिया होते. यावेळी नवागतांचे पूजन करून स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते मुलांना पुस्तके वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक छाया तिवडे यांनी स्वागत केले. कांचन बडगुजर यांनी आभार मानले. यावेळी पालक, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा