त्र्यंबकेश्वर : वाळविहीर येथील सातवीतील सागर गोविंद सोडनर (१४) याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सागर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने जंगलात गुरे चारण्यासाठी गेला होता. रानात त्याला सर्पदंश झाल्याने त्याच्यावर सापाच्या विषाचा परिणाम दिसू लागल्याने तो जंगलातच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या सहकाºयाने घरी येऊन सांगितल्याने घरची माणसे रानात गेले. त्यास घोटी येथे जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.
शाळकरी मुलाचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:33 IST