वनसगावची शाळा लोकवर्गणीतून डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 04:06 PM2019-07-06T16:06:46+5:302019-07-06T16:07:04+5:30

लोकार्पण सोहळा : शाळेचा बदलला चेहरामोहरा

The school of Wansagavan is a digital one in the public domain | वनसगावची शाळा लोकवर्गणीतून डिजिटल

वनसगावची शाळा लोकवर्गणीतून डिजिटल

Next
ठळक मुद्देशाळेच्या भितींवर बोलके चित्र काढण्यात आले असल्याने शाळेने नवे रुप धारण केले आहे.

वनसगांव : लासलगाव बिटातील वनसगांव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकत लोकवर्गणीतून शाळेला डिजिटल बनविले आहे.
शाळेची पटसंख्या ११५ आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग डिजिटल केले असून चार अ‍ॅण्डरॉईड टीव्ही संचही बसवण्यात आले आहे. याशिवाय शाळेच्या भितींवर बोलके चित्र काढण्यात आले असल्याने शाळेने नवे रुप धारण केले आहे. डिजिटल शाळेचा लोकार्पण सोहळा पंचायत समितीचे सभापती सोमनाथ पानगव्हाणे, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवा पाटील सुरासे, सरपंच उमेश डुंबरे, विस्तार अधिकारी व्ही.एन थोरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत झाला. शाळा हा विद्यार्थ्यांचा केंद्र बिंदू असून शिक्षणाचे बीज शाळेतूनच पेरले जात असल्याने तेथे चांगल्या वातावरणात संस्काराची जडणघडण होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य शिवा पाटील सुरासे यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापङणीस, समाधान पवार,मुरलीधर शिंदे, धनंजय डुंबरे, संदीप ङुंबरे, सुनिल शिंदे, प्रदीप कापडी, दिपक घाडगे, विष्णू अस्वले, दिपक कापडी, भाऊसाहेब शिंदे, रंगनाथ शिंदे, विशाल जावळे, चिंधु शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .

Web Title: The school of Wansagavan is a digital one in the public domain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.