नाशिक : शहरातील महापालिकेसह विविध खासगी शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून शिक्षकांनी टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शाळांची कार्यालये उघडल्याने पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासह शाळा स्वच्छता आणि निर्जंतकीकरणाचे कामही हाती घेतले आहे. राज्यभरात कोरोनामुळे २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळा आज अखेर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाशिवायच उघडल्या. दरवर्षी वेगवगेळ््या शाळांकडून पहिल्या दिवशी शाळेत येणाºया विद्यार्थ्यांचे वेगवेगळ््या पद्तीने स्वागत केले जाते. परंतु. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शाळा सुरू करण्यासंदर्भात अंतीम निर्णय झालेला नाही. मात्र, शालेय कामकाजासाठी शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत येण्यास परवानगी मिळाल्याने सोमवारी विविध शासकीय शाळांसोबतच खासगी, अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्वच शाळांची कार्यालये उघडल्याचे दिसून आले. मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेते उपस्थित राहून फिजिकल डिस्टन्सचे पालनक करीत शाळेची साफसफाई, मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करणे, तसेच नवीन वर्षासाठी विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक तयार करणे यासंदर्भातील कामकाजास सुरुवात केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकासाठी सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून सर्वांसाठी मास्क व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सुचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे शाळेत प्रवेशाच्या चौकशीसाठी येणाऱ्या पालकांसाठी शाळेच्या प्रवेश्द्वाराजवळच सुचना फलक लावण्यात आले असून या माध्यातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी माहिती देण्यात येत आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही त्यांचे कर्तव्य बजाविण्यास सुरुवात करीत शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अद्याप शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यास परवानगी दिलेली नसली तरी हे कर्मचारी शाळेतील सर्व वर्ग स्वच्छ करून त्यांचे निर्जंतुकीकरण करीत असल्याचे दिसून येत आहे. तर शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचे आदेश प्राप्त झालेले नाही. आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गुणपत्रके तयार करण्याच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, यापुढे उद्यापासून शाळा नियमित सुरु होईपर्यंत शिक्षकांना दिवसाआड बोलाविण्याचे नियोजन आहे. शिक्षण विभागाकडून आदेश आल्यानंतरच शाळा नियमित सुरू होतील अशी प्रतिक्रिया सागरमल मोदी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी व्यक्त केली आहे.
शाळांची कार्यालये उघडली ; शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 15:05 IST
शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून शिक्षकांनी टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासह शाळा स्वच्छता आणि निर्जंतकीकरणाचे काम हाती घेतले आहे.
शाळांची कार्यालये उघडली ; शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू
ठळक मुद्देशहरातील विविध शाळांची कार्यालये सुरु कार्यालयीन कामकाजास सुरुवात शाळांची स्वच्छता, निर्जंतकीकरण सुरू