सोनांबे विद्यालयात पाणी फाउंडेशनचे शालेय सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:50 IST2019-01-10T17:50:14+5:302019-01-10T17:50:27+5:30
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील जनता विद्यालय या शाळेपासून पाणी फाऊंडेशनच्या निसर्गाची धमाल शाळा या उपक्र माची सुरूवात झाली.

सोनांबे विद्यालयात पाणी फाउंडेशनचे शालेय सत्र
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील जनता विद्यालय या शाळेपासून पाणी फाऊंडेशनच्या निसर्गाची धमाल शाळा या उपक्र माची सुरूवात झाली.
जिल्हा समन्वयक विकास गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना, सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच गावाची शिक्षण कमिटी यांच्यासमोर आपल्या या उपक्रमात सविस्तर माहिती दिली. तसेच मुलांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम रूजवण्याची गरज याबद्दल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक यांनी देखील या उपक्रमाची स्तुती करत, भावी पिढी घडवण्याचा हा खूप चांगला मार्ग असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सरपंचांनी शाळेसोबत गाव देखील आवर्जून स्पर्धेत सहभागी होईल असे आश्वासन दिले. मुलांसोबत सत्र घेण्यासाठी प्रियंका फाटक, विलास भालेराव आणि लक्ष्मण साखरे आदी सामाजिक प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थी सत्रांमध्ये सहभागी झाले होते.