शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे शाळा इमारत कोसळली

By admin | Updated: September 23, 2015 23:30 IST

मुसळधार पावसामुळे शाळा इमारत कोसळली

 सोग्रस : चांदवड तालुक्यातील कानमंडाळे, येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा बहुतेक भाग हा चोवीस तास चाललेल्या मुसळधार पावसाने जमीनदोस्त झाला. ही इमारत रात्रीच्या वेळी कोसळल्याने सुदैवाने अनर्थ टळला. अगोदरच जीर्णावस्थेत असलेली ही इमारत मुसळधार पावसात तग धरू शकली नाही. इमारत कोसळल्याने शैक्षणिक प्रक्रिया बंद पडू नये म्हणून शिक्षकांनी एकाच खोलीत दोन वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्रित बसवून शाळा सुरू ठेवली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी कानमंडाळे जिल्हा परिषद गटाचे सदस्य दादाभाऊ अहिरे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामशिक्षण समिती, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी ताबडतोब बैठक घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त करण्याविषयी पंचायत समिती चांदवड, जिल्हा परिषद नाशिक, आमदार डॉ. राहुल अहेर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पालकमंत्री यांना निवेदन दिले. या शाळेच्या दुरुस्तीसाठी किंवा नव्याने इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध न करून दिल्यास या शाळेला कायमस्वरूपी कुलूप लावण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ अहिरे, समाधान घडोजे, बाजीराव चौधरी, निरंजन दवंगे, वसंतराव जाधव आदिंसह ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)