बोरदैवत परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:03 IST2018-01-28T23:18:47+5:302018-01-29T00:03:58+5:30
तालुक्यातील बोरदैवत गावी बोळकी शिवार परिसरात बकरीवर बिबट्याने हल्ला करून सीताराम हिरामण चव्हाण यांच्या बकरीचा फडशा पाडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे.

बोरदैवत परिसरात बिबट्याची दहशत
कळवण : तालुक्यातील बोरदैवत गावी बोळकी शिवार परिसरात बकरीवर बिबट्याने हल्ला करून सीताराम हिरामण चव्हाण यांच्या बकरीचा फडशा पाडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. बोरदैवत परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका गाईचा फडशा पाडला होता. नागरिकांनी या परिसरात बिबट्याचा आवाजही येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. सीताराम हिरामण चव्हाण यांच्या शेतात बिबट्याने बकरीचा फडशा पाडल्याचे आढळून आले आहे. वनविभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. वनविभागाच्या कर्मचाºयांकडे अनेकदा तक्रार करूनही बिबट्याचा बंदोबस्त करण्याची कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. वनविभाग एखादा नरबळी जाण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. या बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. या भागातील शेतकºयांना दिवसा व रात्री अपरात्री शेतीच्या कामासाठी बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे गणप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.