The scarcity of two thousand MW due to demand increases | मागणी वाढल्याने दोन हजार मेगावॉट््सचा तुटवडा
मागणी वाढल्याने दोन हजार मेगावॉट््सचा तुटवडा

एकलहरे : उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीजनिर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. सध्या महानिर्मितीच्या थर्मल, गॅस, हायड्रो, सोलर व इतर स्रोतांच्या माध्यमातून १६,४१९ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. मात्र मागणी १८,४५८ मेगावॉट असल्याने सध्या दोन हजार मेगावॉटची तूट भरून काढावी लागत आहे. दरम्यान, प्रॉड््क्शन कॉस्ट जास्त असल्याने सध्या परळीचे सर्व संच बंद ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील सर्वच वीजनिर्मिती संचातून जास्तीतजास्त वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. कोराडीचे २१० मेगावॉटचे २ व ६६० मेगावॉटचे ३ अशा पाच संचांची निर्मिती क्षमता २४०० मेगावॉट असून, १४०१ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. नाशिकच्या २१० मेगावॉटच्या तीनही संचांतून ४४८ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. वास्तविक या केंद्राची क्षमता ६३० मेगावॉट इतकी आहे. भुसावळ येथे २१०चा एक व ५००चे दोन संच मिळून तेथील उत्पादन क्षमता १२१० मेगावॉट आहे. सध्या २१०चा संच बंद आहे; तर ६३०च्या दोन संचांमधून ४४८ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू  आहे.
पारसला २५०च्या दोन संचांची क्षमता ५०० आहे. तेथे ४५९ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. परळी येथे २१०चे दोन व २५० चे तीन संच मिळून ११७० निर्मिती क्षमता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथील सर्व संच बंद ठेवण्यात आले आहेत.अशीही तेथे पाण्याची समस्या भेडसावते आहे. मात्र वीजनिर्मिती खर्च जास्त होत असल्याने तेथील संचदेखील बंद ठेवल्याचे सांगितले जाते.
खापरखेडा येथे २१०चे चार व ५००चा एक अशा पाच युनिट््सची क्षमता १३४० मेगावॉट आहे. तेथील सर्व युनिट््स कमी अधिक प्रमाणात सुरू असून, सद्यस्थितीत ८९८ मेगावॉट वीजनिर्मिती करीत आहेत. चंद्रपूर येथे २१०चे दोन व ५००चे पाच अशा सात संचांंची निर्मिती क्षमता २९२० मेगावॉट आहे. तेथील सर्व संच पूर्ण क्षमतेने सुरू असून, सध्या २४७० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. (ही सर्व आकडेवारी दोन दिवसांपूर्वीची आहे. विजेची मागणी व संचांच्या उपलब्धतेनुसार वीजनिर्मिती कमी-अधिक होत असते.)
विजेच्या अन्य स्रोतांची परिस्थिती  या व्यतिरिक्त उरणच्या गॅस टर्बाइनची वीजनिर्मिती २७० मेगावॉट सुरू आहे. त्यामुळे कोल व गॅस मिळून ६,९३७ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.
महानिर्मितीच्या हायड्रोचे कोयना, केडीपीएच, वैतरणा, तिल्लारी, भिरा, घाटघर व इतर अशी ६४५ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. साक्र ी व सिरसुफळ येथील सोलर प्लांटमधून अनुक्र मे ६५ व २६ मेगावॉट निर्मिती होत आहे.
महानिर्मितीचे एकूण जनरेशन ७,५८२ इतके आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रातील घाटघर पंप, जिंदाल, अदाणी, आयडियल एनर्जी, रतन इंडिया, बुटीबोरी, एसडब्ल्यूपीजीएल, धारिवाल, पायोनियर व इतर यांची एकूण ७४० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे मुंबई वगळता स्टेट जनरेशन ७,५८२ मेगावॉट इतके आहे.
सध्या राज्याची विजेची मागणी २११४५ मेगावॉट आहे व सर्व स्रोतांद्वारे वीज उत्पादन १६४१९ मेगावॉट आहे. उत्पादन व मागणीतील तूट भरून काढण्यासाठी परराज्यातील विजेचा पुरवठा केला जातो किंवा लोडशेडिंग करून मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत ताळमेळ साधळा जात आहे.


Web Title:  The scarcity of two thousand MW due to demand increases
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.