पिंपळगाव (वा.) परिसरात कांदा बियाण्यांचा तुटवडा

By Admin | Updated: June 3, 2014 00:52 IST2014-06-03T00:33:54+5:302014-06-03T00:52:44+5:30

पिंपळगाव वाखारी : परिसरात पोळ कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, भाव गगनाला भिडले आहेत.

Scarcity of onion seed in Pimpalgaon (V.) area | पिंपळगाव (वा.) परिसरात कांदा बियाण्यांचा तुटवडा

पिंपळगाव (वा.) परिसरात कांदा बियाण्यांचा तुटवडा

पिंपळगाव वाखारी : परिसरात पोळ कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्यात भाव न राहिल्यामुळे अनेक शेतकरी पोळ कांदा बियाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागामार्फत दुष्काळी स्थिती असणार्‍या गावात सवलतीच्या दरात पोळ कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. अवकाळी पाऊस, गारांचा वर्षाव व काही ठिकाणी भीषण दुष्काळस्थिती यामुळे पोळ कांद्याचे बियाण्याकरिता लावलेले टेंगळे पूर्णत: वाया गेले. त्याचा परिणाम परिसरात होणारे पोळ कांद्याचे बियाणे उत्पादनावर झाला. परिसरात यंदा पोळ कांदा बियाणे उत्पन्न शून्य आहे. जूनमध्ये मृगाचा पाऊस झाल्यास कांदा बियाणेपासून रोप तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. कांदा बियाणेसाठी सध्या शेतकरी लांब जाऊन स्वस्त बियाण्यांचा शोध घेत असून, सर्वत्र बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांच्या कुवतीबाहेर सध्याचे भाव असल्याने अनेक शेतकर्‍यांना कांदा लागवडीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने दुष्काळी गावांना सवलतीच्या दरात पोळ कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Scarcity of onion seed in Pimpalgaon (V.) area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.