पॉलिसीच्या नावे सव्वादोन लाखांची फसवणूक
By Admin | Updated: May 3, 2017 16:54 IST2017-05-03T16:54:46+5:302017-05-03T16:54:46+5:30
पॉलिसीच्या नावे सव्वादोन लाखांची फसवणूक

पॉलिसीच्या नावे सव्वादोन लाखांची फसवणूक
नाशिक : सिप पॉलिसीच्या रोख रकमेचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून २ लाख ११ हजार रुपयांची रोकड आॅनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून तिचा अपहार केल्याचा प्रकार सिडकोतील गणेश चौकात उघडकीस आला आहे़
सिडकोच्या गणेश चौकातील गुणवंत युवराज पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ १८ जानेवारी रोजी पाटील हे आपल्या कंपनीत संगणकावर काम करीत असताना मध्य प्रदेशातील इंदूर येथील संशयित हर्ष भट्टाचार्य, राहुल शर्मा व ओम ठाकूर यांनी मेलवर आॅनलाइन खरेदी केलेल्या सिप पॉलिसीचा रोख रकमेचा धनादेश दिला जाणार असल्याचे सांगितले़ यानंतर पाटील यांच्या आयसीआयसीआय बँक खात्याची माहिती घेत तत्काळ २ लाख ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले़ यानंतर ही रक्कम भट्टाचार्य, शर्मा व ठाकूर यांच्या खात्यावर वर्ग करून पाटील यांना पॉलिसीचा चेक वा रोख रक्कम न देता त्यांची फसवणूक केली़
याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात तिघा परप्रांतीय संशयितांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)