महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीजबिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:00 IST2020-06-22T22:13:11+5:302020-06-22T23:00:38+5:30

सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली आहे. दरमहा चारशे ते पाचशे रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक कर लादला आहे. संबंधित कंपनीने बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार दिलीप बोरसे यांनी दिला आहे.

Savva electricity bills from MSEDCL | महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीजबिले

महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीजबिले

ठळक मुद्दे बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली आहे.
दरमहा चारशे ते पाचशे रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक कर लादला आहे. संबंधित कंपनीने बिलांची दुरुस्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार दिलीप बोरसे यांनी दिला आहे.
लॉकडाउन काळात उन्हाळा असल्याने प्रत्येक ग्राहकाने मोठ्या प्रमाणात फॅन, कूलर, टीव्ही, मिक्सर यांचा वापर केला असेलही मात्र वीज वितरण कंपनीने थेट मीटर रीडिंग न घेता सरासरीने वीजबिले दिली आहेत. नियमित वीजबिले भरणारे सामान्य ग्राहक या प्रकाराने चक्र ावून गेले असून, कुणाला साडेतीन ते चार हजार तर काहींना सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत तीन महिन्यांची बिले देऊन लूट केल्याचा आरोप आमदार बोरसे यांनी केला आहे. सरसकट दोनशे ते-तीनशे युनिट्सची सूट देण्याची मागणी बोरसेंनी केली आहे.\जून २०१९ व जून २०२० या दोन महिन्यातील वीज वापराची बिलावर आकडेवारी.
जूनमध्ये प्रत्येक ग्राहकाने पाचशे ते आठशे युनिट अतिरिक्त वापर केल्याची आकडेवारी.
वीज वितरणकडून सरासरी
एका युनिटमागे एक रु पया
४५ पैसे वहन आकारणी.
प्रत्येक वीज ग्राहकास सरासरी आठशे ते हजार रु पयांचा भुर्दंड लादण्यात आला आहे.

Web Title: Savva electricity bills from MSEDCL