सावकी ग्रामपंचायतीत प्रगती पॅनल विजयी
By Admin | Updated: April 20, 2016 00:23 IST2016-04-19T23:34:57+5:302016-04-20T00:23:16+5:30
सावकी ग्रामपंचायतीत प्रगती पॅनल विजयी

सावकी ग्रामपंचायतीत प्रगती पॅनल विजयी
लोहोणेर : देवळा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या सावकी (लो) ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाचे माजी सरपंच अरुण शिवले व कारभारी पवार, सुरेश पाटील, प्रताप पाटील यांच्या गटाने सत्ता अबाधित राखून गावावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे समर्थकांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. सावकी ग्रामपंचायतीची निवडणूक पंचायत समितीचे सभापती अशोक बोरसे यांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र सुरेश पाटील, धर्म शिवले, प्रताप पाटील, पोपट तिवारी, भाजपाचे किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आदिंच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने अशोक बोरसे यांच्या नम्रता पॅनलचा दणदणीत पराभव केला. कारभारी पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नऊ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले, तर अशोक बोरसे यांच्या पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते) - वार्ड क्र -१ कारभारी पवार (३२३ ), रामदास गोधडे (३०१), आक्काबाई गायकवाड (३११), वार्ड क्र. २- भिका वाघ (३९६), उषाबाई सोनवणे (४३२), सुवर्णा पाटील (४०६), वार्ड क्र. ३- मनीषा सोनवणे (२५७), अहिल्याबाई पवार (२७९), अरुण पाटील (२६८), वार्ड क्र. ४- संजय गांगुर्डे (१५३), वैशाली बोरसे (१३८) आदिंचा समावेश आहे.
निकाल घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. सावकी गावातून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सुरेश पाटील, प्रताप पाटील, धर्म शिवले, दशरथ अहिरे, वसंत देवरे, गणेश तिवारी, पुंडलीक शिवले, दिनकर पाटील, शरद निकम, जिभाऊ शिवले, भाऊसाहेब पवार, कांतीलाल दुबे, रमेश अहिरे, राजू गांगुर्डे, भिका गायकवाड, संजय गायकवाड, केवळ भामरे, दिलीप तुकाराम पाटील यांसह समर्थक
व ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)