नाशिक : शहरातील जिजाऊ ब्रिगेडतर्फे ३ ते १२ जानेवारी या कालावधीत सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव उत्साहात साजरा केला. कांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारीला जयंती असून, १२ जानेवारीस राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आहे. या दहा दिवसांत भारतभरात होऊन गेलेल्या महान स्त्रियांच्या इतिहासाला उजाळा देत वास्तववादी इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न जिजाऊ ब्रिगेडतर्फे या दशरात्रोत्सवात करण्यात आला.
जिजाऊ ब्रिगेडतर्फे दशरात्रोत्सवाची सुरवात ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून करण्यात आली, तर सांगता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्याने करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा धोंडगे यांनी प्रस्ताविक केले. विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावरील कविता सादर केल्या, तर उपाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची दिली. दरम्यान, संघटनेच्या नवीन शाखाप्रमुखांची निवड करण्यात आली. यावेळी प्रियंका पाटील, चारुशीला देशमुख, नीलिमा निकम, संगीता शिंदे, ज्योती भोसले, गीता नगरकर, शांताबाई शिंदे, सारिका नगरकर आदी उपस्थित होते.
(फोटो-१२जिजाऊ ब्रिगे़ड)