रक्षा विसर्जीत न करता वृक्षारोपनाने केल्या स्मृती जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:51 IST2019-02-10T17:51:15+5:302019-02-10T17:51:56+5:30
सिन्नर : तालुक्यातील कीर्तांगळी येथे अनोख्या पध्दतीने वृक्षारोपण करण्यात आले. आईचे रक्षा विसर्जन न करता त्या माध्यमातून आईची स्मृती जागरूक ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर वृक्षारोपण करून केले.

रक्षा विसर्जीत न करता वृक्षारोपनाने केल्या स्मृती जतन
सिन्नर : तालुक्यातील कीर्तांगळी येथे अनोख्या पध्दतीने वृक्षारोपण करण्यात आले. आईचे रक्षा विसर्जन न करता त्या माध्यमातून आईची स्मृती जागरूक ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर वृक्षारोपण करून केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
ग्रामीण भागामध्ये मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळावी, या उद्देशाने विविध जुन्या रूढी, परंपरा आजही मानव जातीला अगदी घट्ट चिकटून बसल्या आहेत. मृतदेहाला भडाग्नी दिल्यानंतर उर्वरीत अस्थी आणि रक्षा विसर्जनासाठी परंपरेनुसार विविध तीर्थस्थळावर जाण्याची नातलगांची भावना आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील कीर्तांगळी या छोट्याशा गावातील चव्हाणके कुटुंबियांनी जलप्रदुषणाची समस्या लक्षात घेऊन पारंपरिक प्रथेला फाटा देत आईच्या मृत्यूनंतर रक्षा विसर्जन न करता आपल्याच शेतातील बांधावर याच राखेचा उपयोग करून वृक्षारोपण करीत आपल्या मायमाऊलीची आठवण कायम स्मरणात राहील हा उद्देश समाजासमोर ठेवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श उभा केला आहे.